कागदी पुस्तकात ई-बुकची वैशिष्ट्ये! | पुढारी

कागदी पुस्तकात ई-बुकची वैशिष्ट्ये!

लंडन :  संशोधकांनी एक असे पुस्तक बनवले आहे जे कागदाचे असूनही त्यामध्ये एखाद्या ई-बुकसारखी वैशिष्ट्ये असतील. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या सहाय्याने इंग्लंडच्या सर्रे युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे पुस्तक विकसित केले आहे. ते मोबाईल, कॉम्प्युटर किंवा स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट होऊ शकते. त्यामध्ये बोटांनी हायलाईट करून इंटरलिंक सूचनांपर्यंत पोहोचता येऊ शकते. एखाद्या पात्राच्या नावाला स्वाईप करून त्याच्याबाबत आणखी माहिती घेता येऊ शकते.

यामध्ये अशा प्रकारच्या शाईचा वापर केला आहे जी पान उलटताच सक्रिय होऊ शकेल. विशेष म्हणजे, हे पुस्तक वाचण्यासाठी बाह्य प्रकाशाची आवश्यकता नाही. त्यासाठी पुस्तकाच्या पानांमध्येच सोलर पॅनेल लावण्यात आले आहेत; मात्र या पुस्तकात सध्या ऑक्सिजन व आर्द्रतेपासून संरक्षणासाठीचे उपाय नाहीत. पानांमध्ये मॅजिक बुकमार्क लावताच पुस्तकाचे सर्व फंक्शन्स काम करू लागतात. अर्थात, असे पुस्तक ही काही अगदी नवी बाब नाही. या ई-बुकचे हे तिसरे जनरेशन आहे.

सध्या या पुस्तकाची अशी पाने बनवण्याचे काम सुरू आहे ज्यांची जाडी अधिक नसेल. विद्यापीठात अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधील लेक्चरर रादू स्पोरिया यांच्या माहितीनुसार ट्रॅव्हल गाईडस् आणि कोर्सच्या पुस्तकांचा विचार करता ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित पुस्तकाबाबत संशोधन केले जात आहे. हे सर्व फिचर्स ई-बुक्समध्ये आहेतच; पण हे फिचर्स कागदाच्या पुस्तकात आणण्याचे आव्हान होते.

Back to top button