भूतं?… हा खेळ सावल्यांचा..! | पुढारी

भूतं?... हा खेळ सावल्यांचा..!

न्यूयॉर्क : जगाच्या पाठीवर अनेक अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्येच अमेरिकेतील एका डोंगरावर दिसणार्‍या गूढ, मनुष्याकृती सावल्यांचा समावेश होतो. गेल्या तीनशे वर्षांपासून या डोंगरावर अशा सावल्या पाहायला मिळतात व त्याचे गूढ अद्यापही उकलले नाही!

अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या डोंगरांवर या सावल्या दिसतात. या विचित्र सावल्या अनेक वेळा आकाशात उडतानाही दिसतात. जणू काही एखादी व्यक्तीच समोर असल्यासारखा भास यामुळे माणसाला होऊ शकतो. काही क्षण समोर राहिल्यानंतर त्या अचानक गायबही होतात. या सावल्यांना ‘डार्क वॉचर्स’ असे म्हटले जाते. किंचित अस्पष्ट अशा या विचित्र सावल्या आहेत. त्यांची लांबी सुमारे दहा फूट असते.

टोपी व जॅकेट घातलेल्या एखाद्या माणसासारख्या आकाराच्या या सावल्या असतात. त्या सहसा पहाटे किंवा सायंकाळी अशा संधीकाळात दिसतात. कॅलिफोर्नियातील सांता लुसिया पर्वतराजीत गिर्यारोहण करणार्‍या अनेक लोकांनी या सावल्या पाहिल्याचे सांगितले जाते. पर्वत, प्रकाश आणि ढगांच्या स्थितीमुळे अशा सावल्या निर्माण होत असाव्यात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Back to top button