हृदयासाठी गुणकारी असतात भोपळ्याच्या बिया | पुढारी

हृदयासाठी गुणकारी असतात भोपळ्याच्या बिया

नवी दिल्ली : अनेक घरांच्या परसात भोपळ्याचा वेल असतो. पावसाळ्यात अनेक जण भोपळ्याच्या बिया पेरतही असतात. या बिया आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी असतात. विशेषतः हृदयासाठी या बियांचे सेवन करणे लाभदायक ठरू शकते.

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक खनिजे, जीवनसत्त्वे तसेच मोठ्या प्रमाणात फायबर असते. अँटिऑक्सिडंटस्ने संपन्न असलेल्या या बियांचे सेवन केल्याने शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते व अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. भोपळ्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक यासारखी अनेक खनिजे असतात. भोपळ्यातील सेलेनियम हे अँटिऑक्सिडंटचे काम करते व शरीराला फ्री सेल डॅमेजपासून वाचवते. सेलेनियम हे पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरपासूनही वाचवते.

भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी भोपळ्याच्या बिया गुणकारी आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये ‘ई’ जीवनसत्त्व आणि कॅरोटिनॉईडसारखी अँटिऑक्सिडंटस् असतात. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते. भोपळ्यात झिंक म्हणजेच जस्त असल्याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

Back to top button