सर्वात वजनदार... 4 किलोंचा आंबा! | पुढारी

सर्वात वजनदार... 4 किलोंचा आंबा!

लंडन : ‘फळांचा राजा’ म्हटलं की आपल्या तोंडातून आपोआपच ‘आंबा’ हा शब्द निघतो. आपल्याकडे हापूस आंबा तर अक्षरशः सम टासारखाच मिरवत असतो. मात्र, आपण कधी भल्या मोठ्या आकाराचा हा ‘राजा’ पाहिलेला नसेल. कोलंबियातील एका शेतकर्‍याच्या शेतात असा खरोखरच ‘किंग साईज’चा आंबा लागला आणि त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली.

जर्मन ऑरलँडो नोवोआ आणि त्यांची पत्नी रीना मारिया मारोक्‍विन यांच्या शेतातील झाडाला हा भला मोठा आंबा लागला. तो तब्बल 4.25 किलो वजनाचा होता. इतक्या मोठ्या आकाराचा आंबा पाहून अर्थातच या दोघांचे आणि इतरांचेही डोळे विस्फारले गेले. कालांतराने तर तो जगातील सर्वात मोठा आंबाही ठरला. गिनिज बुकच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही या आंब्याबाबतची माहिती देण्यात आली. त्याची नोंद ‘जगातील सर्वात वजनदार आंबा’ अशी करण्यात आली आहे. या आंब्याचा रंग तांबूस असून तो आकारानेही मोठा आहे.

Back to top button