सापाने अंडी म्हणून गिळले दोन गोल्फ बॉल!

सापाने अंडी म्हणून गिळले दोन गोल्फ बॉल!
Published on
Updated on

न्यूयॉर्क ः साप आपलं भक्ष्य असलेला उंदीर, अंडी सहजपणे गिळत असतात. मात्र, याबाबत त्यांचीही काही गफलत होऊ शकते आणि ते त्यांच्या जीवावर बेतू शकते. अमेरिकेच्या नॉर्न कोलोरॅडो गोल्फ कोर्टवर एका सापाची अशीच गफलत झाली. त्याने अंडी समजून तेथील दोन गोल्फ बॉल गिळंकृत केले. हे बॉल त्याच्या गळ्यातच अडकले आणि त्याचा जीव टांगणीला लागला. शेवटी माणसाच्या मदतीनेच या संकटातून त्याची सुटका झाली!

सापाने गोल्फ बॉल गिळले आहेत हे लक्षात येताच गोल्फ कोर्टवरील सदस्यांनी याबाबतची माहिती वाईल्डलाईफ सेंटरशी संपर्क साधून दिली. वाईल्डलाईफ सेंटरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की अशी घटना रोज पाहायला मिळत नाही. आमच्या टीमला मदतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी आमच्या लक्षात आले की सापाने दोन बॉल गिळले आहेत.

ते बॉल त्याच्या गळ्यातच अडकले होते. सापाला वाटलं की ही अंडी आहेत. त्यामुळे त्याची फसगत झाली. वाईल्डलाईफ सेंटरच्या कर्मचार्‍यांनी अर्धा तास शस्त्रक्रिया करून हे बॉल बाहेर काढले. वाईल्डलाईफ सेंटरने याबाबतचे फोटोही सोशल मीडियात शेअर केले आहेत. अनेक यूजर्सनी याबाबत कमेंटस् दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news