दात असूनही शिकार का गिळतात मगरी? | पुढारी

दात असूनही शिकार का गिळतात मगरी?

नवी दिल्ली :  काळाचा जबडा आणि मगरीचा जबडा यामध्ये काही फरक नाही. या जबड्यात अडकलेला सहीसलामत सुटणे कठीणच. मगरीच्या जबड्यात अनेक तीक्ष्ण दात असतात, मात्र मगर भक्ष्याला चावून न खाता गिळून टाकत असते. मगरी असे का करतात हे माहिती आहे का?

मगर शिकार करण्यासाठी आपला मजबूत जबडा आणि दातांचा आधार घेते. मात्र, भक्ष्य एकदा जबड्यात आल्यावर त्याला सरळ गिळून टाकते. याचे कारण म्हणजे मगरीचे दात भक्ष्याला खाण्यासाठी उपयोगी पडत नाहीत. ते केवळ जबडा मजबूत करण्यासाठीच असतात. भक्ष्याला जबड्यात पकडून ठेवण्यासाठीच ते उपयुक्त असतात. त्यांचा वापर चर्वणासाठी केला जात नाही.

त्यामुळे भक्ष्याला जबड्यात पकडल्यावर त्याला चावण्याऐवी मगर त्याला सरळ गिळून टाकते. मगरीच्या जबड्यातील तीक्ष्ण दात पाहता या जबड्यात अडकलेले भक्ष्य सुटणे अतिशय दुरापास्त होते. केवळ याच कारणासाठी हे दात मगरीला उपयोगी पडत असतात.

Back to top button