अनेक वर्षांपासून भटकत आहे ‘शापित’ जहाज | पुढारी

अनेक वर्षांपासून भटकत आहे ‘शापित’ जहाज

न्यूयॉर्क :  ‘फ्लाईंग डचमन शिप’ असे नाव असलेले एक रहस्यमय जहाज आहे. या जहाजाबाबत अशी समजूत आहे की गेल्या 400 वर्षांपासून ते शापित होऊन समुद्रात भटकत आहे. या शापित जहाजाशी संबंधित अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असते. इतकेच नव्हे समुद्रात हे जहाज पाहणे अत्यंत अशुभही मानले जाते!

या शापित जहाजावर जगभरात अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटही बनवण्यात आले आहेत. यासोबतच अनेकांनी फ्लाईंग डचमन शिप प्रत्यक्ष पाहिल्याचा दावाही केला आहे. अर्थातच त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे कुणालाच समजू शकले नाही. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखक निकोलस मॉन्सेरेट यांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात हे जहाज पाहिल्याचा दावा केला होता.

असं म्हणतात की सन 1641 मध्ये जहाजाचा कॅप्टन हेनरीक वेन हॉलंडहून प्रवासाला निघाला होता. मात्र, परतीच्या प्रवासात त्याने वाटेत काही बदल केले. त्याने आपल्या जहाजाला केप ऑफ गूड होपकडे वळवले. कॅप्टनच्या या निर्णयामुळे जहाजात बसलेले प्रवासी खूप नाराज झाले, कारण त्यांना लवकर घरी जाण्याची इच्छा होती. पुढे जात असताना जहाजाला एका जोरदार वादळाचा सामना करावा लागला. या वादळात जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यावेळेपासून हे रहस्यमय जहाज समुद्रात भटकत असल्याचे म्हटले जाते.

Back to top button