जगातील सर्वात लहान बेट | पुढारी

जगातील सर्वात लहान बेट

न्यूयॉर्क : जगात अनेक प्रकारची लहान-मोठी बेटं पाहायला मिळतात. मात्र, न्यूयॉर्कच्या अलेक्झांड्रिया खाडीजवळ जगातील सर्वात लहान बेट आहे. ‘जस्ट रूम इनफ’ असे या चिमुकल्या बेटाचे नाव आहे. या बेटाचा आकार टेनिस कोर्टइतका आहे. विशेष म्हणजे या बेटावर एक चिमुकले घर आणि एक झाडही आहे!

हे बेट इतके लहान आहे की ते घराच्या एका कोपर्‍यात सुरू होते व दुसर्‍या कोपर्‍यात संपते! संपूर्ण जगात 2 हजारांपेक्षा अधिक बेटं आहेत. त्यामध्येच या बेटाचाही समावेश होत असला तरी त्याच्या आकारामुळे ते वेगळे ठरते. या बेटाचा आकार केवळ 3300 चौरस फूट आहे. त्याची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आली आहे.

या बेटाच्या आधी ‘बिशप रॉक’ हे जगातील सर्वात लहान बेट मानले जात होते. मात्र, आता ‘जस्ट रूम इनफ’ हेच बेट सर्वात लहान मानले जाते. ते बिशप बेटाच्या निम्म्या आकाराचे आहे. पूर्वी हे बेट ‘हब आयलंड’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, सन 1950 मध्ये हे बेट एका कुटुंबाने विकत घेऊन तिथे छोटेसे घर बांधले आणि एक झाडही लावले. काही काळानंतर त्यांनी या बेटाचे नाव बदलून ते ‘जस्ट रूम इनफ’ असे केले.

Back to top button