अजूनही चांद्रभूमीवर मानवी पावलांचे ठसे! | पुढारी

अजूनही चांद्रभूमीवर मानवी पावलांचे ठसे!

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ नेहमीच अंतराळातील अनोखी द़ृश्ये लोकांना दाखवत असते. अगदी अलीकडेच जेम्स वेब टेलिस्कोपने टिपलेली  ब्रह्मांडाची छायाचित्रेही ‘नासा’ने शेअर केली होती. मंगळभूमीवरील पर्सिव्हरन्स रोव्हरने टिपलेली छायाचित्रेही ‘नासा’ वेळोवेळी शेअर करीत असते. आता ‘नासा’ने चांद्रभूमीवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन दिसून येतात. विशेष म्हणजे त्यांच्या पावलांचे ठसे आज 53 वर्षांनीही तिथे जसेच्या तसे आहेत!

‘नासा’ने बुधवारी ट्विटरवर लिहिले की आज ‘’अपोलो11’ च्या चंद्रावरील लँडिंगचा वर्धापन दिन आहे. 20 जुलैला ‘अपोलो 11’ चंद्रावर उतरले होते. त्यामुळे यादिवशी ‘इंटरनॅशनल मून डे’ साजरा केला जातो. लूनार रिकनायसन्स ऑर्बिटरने रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ अंतराळवीरांच्या पावलांचे ठसेही दाखवतो, जे इतक्या वर्षांनंतर आजही तिथे अस्तित्वात आहेत. ‘नासा’ने म्हटले आहे की ‘अपोलो11’ ने रोव्हर आणि सर्व्हेअरसारख्या रोबोटिक शोधांचा तसेच ‘अपोलो 8,9,10’ सारख्या क्र मिशनचा मार्ग प्रशस्त केला. लूनार रिकानयसन्स ऑर्बिटर 2009 पासून चंद्राचे निरीक्षण करीत आहे.

त्याने आतापर्यंतच्या कोणत्याही मिशनच्या तुलनेत पृथ्वीवर सर्वाधिक डेटा पाठवला असून तो सुमारे 1.4 पेटाबाईटस्चा आहे. एक पेटाबाईट 500 अब्ज पानांइतका असतो हे विशेष!

Back to top button