निष्क्रिय स्टेलर-मास कृष्णविवराचा शोध | पुढारी

निष्क्रिय स्टेलर-मास कृष्णविवराचा शोध

अ‍ॅम्स्टरडॅम : अंतराळातील कृष्णविवरे ही एक गूढच असतात. एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याचे रूपांतर अशा प्रचंड आकर्षण शक्‍ती असलेल्या कृष्णविवरांत होते. त्यांच्या तावडीतून प्रकाशकिरणही सुटू शकत नसल्याने ही विवरे चटकन ओळखून येत नाहीत व त्यामुळेच त्यांना ‘ब्लॅक होल्स’ किंवा ‘कृष्णविवरे’ असे म्हणतात. आता संशोधकांनी एका अशाच राक्षसी कृष्णविवराचा शोध लावला आहे. हे एक निष्क्रिय असे स्टेलर-मास ब्लॅक होल आहे. हे कृष्णविवर आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या शेजारी असलेल्या आकाशगंगेत आहे.

ज्यावेळी दोन तारे एकमेकांभोवती फिरत असतात व त्यांच्यामुळे एखाद्या कृष्णविवराची निर्मिती होते, त्यावेळी त्याला स्टेलर-मास ब्लॅक होल म्हटले जाते. ज्यावेळी असे कृष्णविवर कोणत्याही प्रकारच्या उच्च स्तरातील एक्स-रेचे उत्सर्जन करीत नाही, त्यावेळी त्याला ‘निष्क्रिय कृष्णविवर’ असे म्हटले जाते. आता संशोधकांनी शोधलेल्या या निष्क्रिय कृष्णविवराला ‘व्हीएफटीएस 243’ असे नाव देण्यात आले आहे. हे कृष्णविवर ‘लार्ज मॅगेलॅनिक क्लाऊड’ आकाशगंगेत आहे. त्याचा शोध ‘ब्लॅक होल पुलिस’ नावाच्या खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमने घेतला आहे. हे संशोधक खास कृष्णविवरांबाबतच संशोधन करतात. नेदरलँडची राजधानी अ‍ॅम्स्टरडॅममधील विद्यापीठाचे संशोधक तोमर शेनर या टीमचे नेतृत्व करीत आहेत.

Back to top button