उभ्या झाडाने घेतला आतून पेट!

झाडाने घेतला पेट
झाडाने घेतला पेट
Published on
Updated on

न्यूयॉर्क :   कधी कधी निसर्गही अनोखी द‍ृश्ये दाखवत असतो. एका झाडाच्या बुंध्यात असलेल्या ढोलीतून धबधब्यासारखे पाणी पडत असतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच आला होता. आता अशाच एका झाडाने आतून पेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे.

हा फोटो अमेरिकेतील रिजविले शहरातील आहे. हे उभे झाड एकाएकी असे पेटले. तेथील अग्‍निशमन दलाने या जळत्या झाडाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.

रिजविले अग्‍निशमन विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की सकाळी आम्हाला एका झाडाला आग लागल्याची माहिती मिळाली. हे झाड शोधण्यासाठी आम्ही घटनास्थळी पोहोचलो तर समोरचे द‍ृश्य पाहून आम्हाला आश्‍चर्य वाटले. वीज कोसळल्याने हे झाड असे पेटले. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. हे सुंदर झाड अशा रितीने गमावणे क्लेशदायक असल्याचे एका यूजरने म्हटले. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्‍त केल्या. काहींनी ही भीषण आग पाहून 'हा नरकाचा दरवाजा आहे' अशी प्रतिक्रियाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news