प्लास्टिक प्लेटमध्ये गरम जेवण टाळणेच चांगले | पुढारी

प्लास्टिक प्लेटमध्ये गरम जेवण टाळणेच चांगले

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा : देशात सध्या प्लास्टिकच्या 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर केवळ पर्यावरणाबरोबरच आरोग्यासाठीही घातक असतो. देशात सध्या सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी प्लास्टिकचा डबा अथवा प्लेटस्मध्ये गरम अन्नपदार्थ खात असाल तर त्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका निश्चितपणे बळावतो.

प्लास्टिक सध्या आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी आढळून येते. विशेषज्ज्ञांच्या मते, ज्यावेळी आपण आपले खाणे अथवा जेवण प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवतो, त्यावेळी त्यातील काही केमिकल आपल्या अन्नात मिसळतात. हे केमिकल दिसत नाहीत; पण ते हळू हळू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवत असतात. अन्न फार गरम असेल तर अधिक प्रमाणात केमिकल अन्नात मिसळतात. हे केमिकल म्हणजे रसायनांचे मिश्रण असते.

मात्र, आपल्या खाण्यात अत्यंत घातक असलेले केमिकल मिसळते त्याचे नाव ‘एंडोक्रिन डिस्ट्रक्टिंग’ असे आहे. या घातक केमिकलमुळे हार्मोन्सचा समतोलपणा बिघडतो. हे हार्मोन्स आपले काम योग्यरित्या करू शकत नाहीत. दीर्घकाळ प्लास्टिक भांड्यामध्ये अन्न खाल्यास ते कॅन्सरचे कारण बनू शकते.

Back to top button