वॉटर लिलीची सापडली नवी प्रजात; पण अस्तित्व संकटात | पुढारी

वॉटर लिलीची सापडली नवी प्रजात; पण अस्तित्व संकटात

लंडन : ‘ग्लोबल वॉर्मिंग’व अन्य अनेक कारणांमुळे ‘वॉटर लिली’ या पाण्यात वाढणार्‍या वनस्पतीचे अस्तित्व संकटात सापडले असल्याचे विशेषज्ज्ञांचे मत आहे. लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला असतानाच वॉटर लिलीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.

केवळ पाण्यात उगवणार्‍या वॉटर लिलीचे पान अन्य झाडांच्या पानाच्या तुलनेत अनेक पटीने मोठे असते. सांगावयाचे झाल्यास लिलीचे पान 10 फूट म्हणजे सुमारे 3.2 मीटर इतके रूंद असते. तर फूल माणसाच्या डोक्यापेक्षाही मोठे असते.

वॉटर लिलीच्या नव्या प्रजातीचा शोध इंग्लंड आणि बोलिवियाच्या संशोधकांनी संयुक्त प्रयत्नांंती लावला. नव्या प्रजातीला ‘विक्टोरिया बोलिवियाना’ असे नाव देण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे वॉटर लिलीची ही तिसरी प्रजात आहे. युनायटेड किंगडममधील क्यू गार्डनन्सची नटालिया प्रेजेलोम्स्का यांनी सांगितले की, वॉटर लिलीचे पान इतके मोठे आणि भक्कम असते की, ते एका मुलाचे वजन आरामात पेलू शकते. तसेच 80 किलो वजन असलेल्या माणसाने कितीही दबले तरी ते पान दबले जात नाही. मात्र, हे वजन पानावर सगळीकडे समान असावे.

दरम्यान, बोलिवियाच्या सांता क्रूज ले दा सिएरा बोटॅनिक गार्डन आणि रिनकोनाडा गार्डनने क्यू गार्डन्सला वॉटर लिलीचे बी दिले होते. गार्डनचे हॉटिकल्चरिस्ट कार्लोस मागडलेना यांनी या बिया लावल्या. मात्र, त्यानंतर समजले की, लिलीची ही प्रजात अन्य दोन प्रजातींपेक्षा वेगळी आहे. दरम्यान, वॉटर लिली सध्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ग्लोबल वॉर्मिंग व अन्य समस्यांबरोबरच अ‍ॅमेझान जंगलाच्या वाढत्या तोडीमुळे लिलीचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे.

Back to top button