विवाहासाठी सहन करा मुंग्यांचा चावा | पुढारी

विवाहासाठी सहन करा मुंग्यांचा चावा

कॅलिफोर्निया : जगभरात अनेक अनोख्या जनजाती आहेत. त्यांची परंपरा, खाणे-पिणे, राहणीमान सगळे वेगळेच असते. या आदिवासी जनजाती आजही शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा पाळताना दिसतात. ज्या जंगलात हे लोक राहतात, ते त्यांच्याच मालकीचे असते. यामध्ये तेथील सरकारही हस्तक्षेप करत नाही. जगातील विविध भागात राहणार्‍या आदिवासी जमातींचे रीतीरिवाज कधी कधी आश्‍चर्यचकित करणार्‍या असतात. यापैकीच ब्राझीलमधील जनजातीचे लोक आजही एका अत्यंत धोकादायक परंपरेचे पालन करताना दिसतात. या परंपरेबद्दल ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाहीत.

ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन भागात राहणार्‍या ‘साटेरे-मावा’ जनजातीच्या तरुणांना आपल्या समुदायासमोर आपली बहादुरी सिद्ध करावी लागते. बहादुरी सिद्ध केल्यानंतरच त्यांना तरुण झाल्याचे समजले जाते आणि त्यांच्या विवाहाची तयारी सुरू होते. बहादुरी सिद्ध करण्यासाठी या जनजातीमधील तरुणांना अत्यंत धोकादायक अशा शेकडो मुंग्यांचा एकाचवेळी चावा सहन करावा लागतो. यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी सर्वप्रथम धोकादायक समजल्या जाणार्‍या ‘बुलेट’ मुंग्यांना बॉक्समध्ये घातले जाते. ज्यावेळी त्या चवताळतात, त्यावेळी त्या बॉक्समध्ये तरुणांना हात घालण्यास सांगितले होते. त्यावेळी तरुणांना मुंंग्यांनी केलेला कडकडून चावा सहन करावा लागतो. चाव्यामुळे हातही सुजतो. पण, त्यानंतर ते विवाह करण्यास पात्र ठरतात.

Back to top button