बिकिनी एटोल आहे जगात धोकादायक बेट | पुढारी

बिकिनी एटोल आहे जगात धोकादायक बेट

नवी दिल्ली : जगात अशी अनेक बेटे आहेत की, तेथे माणूस राहात नाही. पॅसिफिक महासागरात असेच एक बेट आहे की जगातील सर्वात जास्त न्यूक्‍लियर कंटेमिनेटेड आयलँड आहे. ‘बिकिनी एटोल’ नामक या बेटावर जाणारी प्रत्येक व्यक्‍ती थेट मृत्यूच्या दाढेत पोहोचते. याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेने या बेटाचा वापर अनेकवेळा अणुबॉम्बची चाचणी घेण्यासाठी केला आहे.

जपानच्या ‘हिरोशिमा आणि नागासाकी’ या बेटावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकताच दुसरे महायुद्ध संपुष्टात आले होते. त्यानंतर अमेरिकेने बिकिनी एटोल बेटावर अनेक अणुचाचण्या घेतल्या. बिकिनी एटोल मार्शल आयलँडच्या साखळीतील हे बेट अमेरिकेने केवळ अणुबॉम्बच्या चाचणीसाठी वापरले. या बेटाचे एकूण क्षेत्रफळ अवघे दोन चौरस किमी इतके आहे. सुरुवातीला या बेटाची लोकसंख्या एकदम कमी होती म्हणजे तेथे केवळ 167 लोक राहात होते. अमेरिकन लष्कराने या लोकांना दुसरीकडे पाठविले.

त्यानंतर अमेरिकेने तेथे 1946 ते 1958 पर्यंत 29 अणुचाचण्या घेतल्या होत्या. यामध्ये 20 हायड्रोजन बॉम्बचा समावेश होता. यामध्ये हिरोशिमा व नागासाकीला भस्मसात करणार्‍या बॉम्बपेक्षा हजार पटींनी शक्‍तिशाली असलेल्या बॉम्बचाही समावेश होता. 1960 च्या दशकानंतर लोकांना बेटावर येण्यास परवानगी देण्यात आली, पण ते पाऊल धोकादायक ठरले. कारण तेथून आलेल्या लोकांच्या शरीरात सिसियम 137 चे प्रमाण 75 टक्क्यांनी वाढले होते. यामुळेच तेथे सध्या कोणीच जात नाही. गेल्यास ते थेट मृत्यूच्या तोंडात पोहोचतात.

Back to top button