‘नासा’ने टिपले अंतराळातील सूर्यग्रहण! | पुढारी

‘नासा’ने टिपले अंतराळातील सूर्यग्रहण!

वॉशिंग्टन : पृथ्वीवरून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अनेक वेळा पाहण्यात येत असतात. मात्र, अंतराळातून अशी ग्रहणे कशी दिसतात याची आपल्याला कल्पना नसते. आता ‘नासा’च्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी (एसडीओ) ने सूर्यासमोरून जात असलेल्या चंद्राची छबी कॅमेर्‍यात कैद केली आहे. ‘एसडीओ’ने बुधवारी 35 मिनिटांच्या या आंशिक सूर्यग्रहणाला रेकॉर्ड केले.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ग्रहण चरम अवस्थेत असताना चंद्राने सूर्याचा 67 टक्के भाग आच्छादित केला होता. एसडीओद्वारे घेण्यात आलेल्या हाय-रिझोल्यूशन छायाचित्रांनी या ग्रहणाचे द‍ृश्य दर्शवले आहे. ऑप्टिक्स आणि फिल्टर सपोर्ट ग्रीडच्या आसपास प्रकाश कसा फैलावतो हे या छायाचित्रांमधून दिसून आले. एकदा त्यांना ‘कॅलिब्रट’ केल्यानंतर एसडीओ डेटाला इन्स्ट्रुमेंटल इफेक्टस्साठी ठीक करणे आणि सूर्याच्या छायाचित्रांना पूर्वीपेक्षा अधिक सुस्पष्ट करणे शक्य आहे. ‘नासा’ने ‘एसडीओ’ला 2010 मध्ये लाँच केले होते.

सूर्याकडून सौर हालचाली कशा केल्या जातात तसेच त्याचा अवकाशीय हवामानावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास ‘एसडीओ’कडून केला गेला. अंतराळातील अशा हालचालींचा पृथ्वीसह सर्व सौरमंडळावर परिणाम होत असतो. सूर्याबाबत अधिक तपशीलाने जाणून घेण्यासाठी ‘एसडीओ’ची चांगली मदत झाली आहे. सूर्याचा पृष्ठभाग तसेच त्याचे चुंबकीय क्षेत्र याबाबत यामुळे अधिक जाणून घेता आले आहे.

Back to top button