जगातील सर्वात प्रमाणबद्ध चेहरा! | पुढारी

जगातील सर्वात प्रमाणबद्ध चेहरा!

न्यूयॉर्क :  सौंदर्याचेही काही मापदंड, ठोकताळे मांडले जात असतात. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्येही अशाच काही मापदंडांचा समावेश होता. आता त्याचा आधार घेऊन तज्ज्ञांनी जगातील सर्वात सुंदर व प्रमाणबद्ध चेहर्‍याचा शोध लावला आहे. अमेरिकन अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड हिचा चेहरा असा सुंदर आहे!

‘स्टेट ऑफ द आर्ट फेस मॅपिंग डेटा’नुसार किम कार्दाशियन आणि केट मॉस यांनाही तिने मागे टाकले आहे. चेहर्‍याचे सौंदर्य तपासण्यासाठी ग्रीक गोल्डन रेशोचा वापर करण्यात आला. चेहर्‍याचे सौंदर्य पाहण्यासाठी हजारो वर्षांपासून हा सिक्रेट फॉर्म्युला वापरला जातो. सर्व नैसर्गिक गोष्टींमध्ये रेशो म्हणजेच एक विशिष्ट प्रमाण असते, असे ग्रीक लोकांचे म्हणणे होते.

त्या मूल्यमापनानुसार अ‍ॅम्बर हर्ड या 36 वर्षांच्या अभिनेत्रीचा चेहरा 91.85 टक्के प्रमाणात आहे. लंडनमधील सर्जन डॉ. ज्युलियन डिसिल्वा यांनी तिची चाचणी घेतली. आधुनिक फेशियल मॅपिंग टेक्निक वापरून ही तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले.

फोटोमध्ये डोळे, नाक, ओठ, भुवया, जबडा, हनुवटी आणि चेहर्‍याच्या आकाराचे प्रमाण तपासले गेले. चेहर्‍यावरच्या 12 मार्कर पॉईंटस्चे विश्‍लेषण करण्यात आले. त्यावरून अ‍ॅम्बर हर्डचा चेहरा ‘ग्रीक रेशो ऑफ फाय’नुसार 91.85 टक्के अचूक असल्याचे आढळले.

Back to top button