‘हे’ विमान अचानक झाले होते गायब! | पुढारी

‘हे’ विमान अचानक झाले होते गायब!

कैरो : जगभरात काही वेळा अतिशय अनोख्या घटना घडत असतात. अशीच एक घटना अगदी अलीकडेच म्हणजे सन 2016 मध्ये घडली होती. त्यावेळी एक विमान कैरोच्या विमानतळावर पोहोचण्यापूर्वी अवघे वीस मिनिटे आधीच अचानक गायब झाले!

जगातील अत्याधुनिक विमानतळांपैकी एक असलेल्या कैरोच्या विमानतळाकडे जाण्यासाठी या इजिप्शियन एअरलाईन्सच्या विमानाने फ्रान्समधून उड्डाण केले होते. या ‘एअरबस-320’ प्रवासी विमानात एकूण 66 लोक (56 प्रवासी आणि दहा कर्मचारी) होते. अचानक ते आकाशातून गायब झाले.

या रहस्यमय घटनेचे गूढ उकलण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत; पण ते अद्यापही कायम आहे. 18 मे 2016 या दिवशी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून या विमानाने कैरोच्या दिशेने उड्डाण केले. चार तासांच्या प्रवासापैकी विमानाने 3 तास 40 मिनिटांचा प्रवास पूर्णही केला होता.

कैरो वीस मिनिटांच्या अंतरावर असताना अचानक या जहाजाचा संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान आकाशात जणू काही गायबच झाले होते. त्याचे दहशतवाद्यांनी अपहरण केले असावे अशीही शंका आली; पण तसे संकेत मिळाले नाहीत.

त्यानंतर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असावे अशीही भीती व्यक्त करण्यात आली. त्याच्या शोधासाठी अनेक महिने अनेक देशांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, कुठलाही सुगावा लागला नाही.

हे विमान गायब होण्याबाबत दोन्ही देशांच्या विमानतळांमध्ये चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी हे विमान सहीसलामत मिळण्याची आशा नसल्याचे जाहीर करून टाकले. आजही या विमानाची कोणतीही माहिती समजलेली नाही.

Back to top button