‘प्लूटो’ने पूर्ण केला नाही सूर्याचा एकही फेरा | पुढारी

‘प्लूटो’ने पूर्ण केला नाही सूर्याचा एकही फेरा

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील ‘प्लूटो’ या ग्रहाचा 18 फेब्रुवारी 1930 रोजी शोध लागला होता. याचा शोध ‘फ्लॅगस्टाफ अ‍ॅरिझोनामधील लोवेल ऑब्झर्व्हेटरी’मधून लावण्यात आला. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ क्‍लाईड टॉमबाग यांनी नेपच्यूनच्या कक्षेबाहेर एक प्रचंड वेगाने जाणारी वस्तू पाहिली. त्यानंतर या खगोलीय पिंडाला प्लूटो हे नाव ठेवण्यात आले. हे नाव ग्रीक शासकाच्या नावे ठेवण्यात आले.

प्लूटोचा शोध लागल्यानंतर या खगोलीय पिंडाला ‘ग्रह’ म्हणावा की ‘बटू’ ग्रह अशी चर्चा सातत्याने सुरू असते. मात्र, प्लूटोची कक्षा नजरेसमोर ठेवून खगोलशास्त्रज्ञांचे असे मत बनले आहे की, जेव्हा टॉमबाग यांनी शोध लावला आहे, तेव्हापासून म्हणजे गेल्या सुमारे 92 वर्षांपासून प्लूटोने सूर्याचा एकही फेरा पूर्ण केलेला नाही. खगोल शास्त्रज्ञांच्या मते, प्लूटोला सूर्याचा एक फेरा पूर्ण करण्यास तब्बल 248.09 वर्षे लागतात. तर ींळाशरपववरींश.लेा कॅलक्यूलेटरनुसार तर शोध लागल्यापासून हा ग्रह येत्या 23 मार्च 2178 रोजी सूर्याचा पहिला फेरा पूर्ण करेल.

खरे तर प्लूटो हा जेथून येतो, त्या भागाला ‘कुईपर बेल्ट’ असे म्हटले जाते. हा बेल्ट बर्फाळ आहे, असे म्हटले जाते. यामुळे येथील सर्व खगोलीय पिंड बर्फाळच असतात. अशा पिंडांना ‘कुईपर बेल्ट ऑब्जेक्टस’ म्हणून ओळखले जाते.प्लूटो आपल्या कक्षेच्या मार्गाने जात असतो तेव्हा तो कधी सूर्याजवळ कधी लांब होत असतो. तसेच सूर्याच्या प्रखर अथवा कमजोर प्रकाशावरही तो प्रतिक्रिया देत असतो.

हेही वाचलंत का?

Back to top button