पाण्याखाली बसून सहा रुबिक्स क्युब सोडवण्याचा विक्रम | पुढारी

पाण्याखाली बसून सहा रुबिक्स क्युब सोडवण्याचा विक्रम

चेन्नई : रुबिक्स क्युबच्या सर्व बाजू एका विशिष्ट रंगात आणण्याचे कोडे सोडवणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी सराव आणि कौशल्य यांची गरज असते. अशी एक क्युब सोडवणेही अनेकांना कठीण जात असते. अशा वेळी चेन्नईमधील एका माणसाने पाण्याखाली बसून सहा क्युब सोडवून नवा विक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आली.

इलायाराम शेखर असे या विक्रमवीराचे नाव आहे. त्याने सांगितले, क्युब सोडवत असताना योग्य प्रमाणात श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य मिळवण्यासाठी मला एक वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर अशा पद्धतीने क्युब सोडवण्याचे कौशल्य मी दाखवू शकलो. शेखर याच्या नावावर रुबिक्स क्युबबाबत अनेक गिनिज रेकॉर्डस् आहेत. आता त्याने केलेला हा सहावा गिनिज बुक रेकॉर्ड आहे. त्याने आता पाण्याने भरलेल्या एका काचेच्या पेटीत बसून 2 मिनिटे आणि 17 सेकंदांमध्ये सहा रुबिक्स क्युब सोडवून दाखवल्या. सहा वर्षांपूर्वी एका अमेरिकन माणसाने अशाच पद्धतीने पाच क्युब्स सोडवून दाखवल्या होत्या.

Back to top button