झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला साप! | पुढारी

झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला साप!

मॉस्को : ही दुनिया खरोखरच अजब आहे. कल्पनेपेक्षाही आश्चर्यकारक गोष्टी या जगात घडत असतात. अशीच एक घटना रशियाच्या दागेस्तान भागातील लेवशी नावाच्या गावात घडली आहे. तिथे एका झोपलेल्या महिलेच्या तोंडात चक्क साप शिरला आणि तिच्या घशात गुदमरून मेला! हा साप चार फूट लांबीचा होता. 

आपल्या तोंडात काही तरी गेले आहे याची जाणीव होताच ही महिला तडक रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी या महिलेला भुलीचे इंजेक्शन दिले व तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू केली. ही महिला रुग्णालयात आली त्यावेळी डॉक्टरांनाही माहिती नव्हते की तिच्या शरीरात साप आहे! तिच्या तोंडातून आत गेलेला हा साप पाहून डॉक्टरही हैराण झाले. या विचित्र ऑपरेशनचे फुटेज दागेस्तानच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केले असून, लोकांनी अंगणात किंवा मोकळ्या जागेत झोपणे टाळावे, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Back to top button