जगातील सर्वात मोठा ‘सोलर ट्री’! | पुढारी

जगातील सर्वात मोठा ‘सोलर ट्री’!

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे जगातील सर्वात मोठा ‘सोलर ट्री’ तयार करण्यात आला आहे. हे कृत्रिम झाड सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करते. या झाडावर एकूण 35 सोलर प्लेटस् लावण्यात आल्या आहेत. 

या सोलर ट्रीसाठी 7.5 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, त्यापासून कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते. हे झाड दरवर्षी 12 ते 14 हजार यूनिट ‘ग्रीन’ ऊर्जा देईल. दुर्गापूरच्या सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने हा सोलर ट्री आपल्या कॉलनीत लावला आहे. विशेष म्हणजे तो हवेत कार्बन उत्सर्जन होण्यापासूनही रोखतो. वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जेचा वापर हा पर्यावरणाला पूरक असल्याने त्याचा आता अनेक ठिकाणी वापर होत आहे. ‘सोलर ट्री’ ही संकल्पनाही आता जगात लोकप्रिय होत आहे.

Back to top button