स्वतः केक बनवून बिल गेटस् यांच्या बफेट यांना शुभेच्छा! | पुढारी

स्वतः केक बनवून बिल गेटस् यांच्या बफेट यांना शुभेच्छा!

वॉशिंग्टन : प्रसिद्ध गुंतवणूकदार व जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेले वॉरेन बफेट आता 90 वर्षांचे झाले आहेत. त्यानिमित्त जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेटस् यांनी त्यांना एक खास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. गेटस् यांनी स्वतः एक चॉकलेट आणि बिस्किट केक बनवला व बफेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गेटस् यांनी वेळात वेळ काढून हा केक स्वतः बनवला. अंडे फेटण्यापासून ते या दोन स्तरांच्या केकवर आयसिंग करून त्यावर बिस्किटांची सजावट करण्यापर्यंत सर्व काही एखाद्या कुशल शेफच्या थाटात सर्व काही गेटस् यांनीच केले. केकवर बफेट यांची प्रतिमाही होती. शेवटी चॉकलेट डस्टने ‘हॅपी नायन्टिंथ बर्थडे वॉरेन’ असे लिहिण्यात आले. मित्राच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी गेटस् यांनी हा व्हिडीओ ट्विटर हँडलवरून शेअर केला व तो लगेचच जगभर व्हायरल झाला. ‘मायक्रोसॉफ्ट’चे साम—ाज्य उभे करणारे बिल गेटस् अत्यंत श्रीमंत व्यक्ती असले तरी ते तितकेच साधे, विनम्र आणि दानशूर व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज जगभरातील श्रीमंत व्यक्ती आपल्या संपत्तीमधील मोठा भाग समाजकार्यासाठी दान देत आहेत. स्वतः बिल आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी आपल्या फाऊंडेशनसाठी अफाट संपत्ती दान दिलेली आहे. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही पती-पत्नी मिळून भांडी स्वच्छ करतो, असे मेलिंडा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते! अर्थात, घरी नोकरचाकर असूनही पत्नीबरोबर भांडी स्वच्छ करताना तिच्यासमवेत वेळ घालवणे आपल्याला आवडते, म्हणून आपण हे काम करतो, असे बिल यांनी सांगितले होते.

Back to top button