कोरोना काळात तिपटीने वाढले डिप्रेशनचे रुग्ण | पुढारी

कोरोना काळात तिपटीने वाढले डिप्रेशनचे रुग्ण

न्यूयॉर्क : जगभर 

सध्या कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. या भीषण महामारीच्या काळात लोकांच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. विशेषतः ‘कोव्हिड-19’ च्या रुग्णांमध्येही डिप्रेशनची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोना काळात जगात डिप्रेशनचे रुग्ण तिपटीने वाढले असल्याचे आढळले आहे.

अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील सँड्रो गॅली यांनी सांगितले की महामारीच्या आधी 8.5 टक्के लोक नैराश्याने ग्रस्त होते. एप्रिलच्या मध्यापर्यंतच 27.8 टक्के संक्रमित लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आली. या पाहणीत आढळले की सर्व वयोगटांमध्ये अशी लक्षणे आढळली. विशेषतः महामारीच्या काळात ज्यांना आर्थिक अडचणी होत्या त्यांच्यामध्ये डिप्रेशनचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले. अशा लोकांमध्ये डिप्रेशनच्या लक्षणांची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा अधिक होती.

Back to top button