‘या’ देशात सापडला दहा कोटी वर्षांपूर्वी बनलेला खड्डा! | पुढारी

‘या’ देशात सापडला दहा कोटी वर्षांपूर्वी बनलेला खड्डा!

सिडनी ः पश्‍चिम ऑस्ट्रेलियात तब्बल दहा कोटी वर्षांपूर्वी बनलेल्या एका खड्ड्याचा शोध घेण्यात आला आहे. हा खड्डा एका उल्केच्या आघातामुळे पडला आहे. एका खाण कंपनीला या खड्ड्याचा शोध लागला. 

या खड्ड्याचा व्यास तब्बल पाच किलोमीटर इतका आहे. इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक सर्व्हेचा वापर करून त्याचा शोध लावण्यात आला. कलगुरली-बोल्डरच्या उत्तरेकडील गोल्डफील्डस् या खाणींच्या शहराजवळ तो आहे. हा खड्डा किम्बर्लेच्या प्रसिद्ध वुल्फ क्रीक क्रेटरपेक्षाही पाच पटीने अधिक मोठा असावा असे अनुमान आहे. सध्या या पाच किलोमीटर व्यासाच्या विवराला जगातील सर्वात मोठ्या आकाराचे ‘मेटियोराइट क्रेटर’ मानले जात आहे. जियोलॉजिस्ट आणि जियोफिजिसिस्ट डॉ. जॅसन मेयर्स यांनी सांगितले की हा एक महत्त्वाचा शोध आहे. हा खड्डा सपाट भूमी असलेल्या जागेत होता व तो अनेक वर्षे भरलेला असल्याने ओळखून आला नाही! यावर्षीच्या सुरुवातीला पश्‍चिम ऑस्ट्रेलियात तब्बल 2.23 अब्ज वर्षांपूर्वीचा असाच खड्डा शोधण्यात आला होता.

Back to top button