आजपर्यंतच्या मोठ्या ‘ब्लॅकहोल’चा शोध | पुढारी | पुढारी

आजपर्यंतच्या मोठ्या ‘ब्लॅकहोल’चा शोध | पुढारी

न्यूयॉर्क : आपले ब्रह्मांड हे अगणित गूढ रहस्यांनी भरलेले आहे. खगोलशास्त्रज्ञ सातत्याने अशी रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करत असतात. शास्त्रज्ञांना याबाबत एक मोठे यश मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ‘ब्लॅकहोल’चा शोध लावण्यात यश मिळविले आहे. या ब्लॅकहोलचे नाव ‘जीडब्ल्यू 190551’ असे आहे. 

जीडब्ल्यू 190551’ नामक विशालकाय ब्लॅकहोलला लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्व्हेटरी लिगो आणि इटलीस्थित गुरुत्वाकर्षण खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे. गुरुत्वाकर्षणीय तरंगांच्या मदतीनेच या ब्लॅकहोलचा शोध लावण्यात आला आहे.

‘जीडब्ल्यू 190551’ असे नाव असलेल्या या ‘ब्लॅकहोल’चे भारमान आपल्या सूर्यापेक्षाही तब्बल 142 पट जास्त आहे.

खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेला हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा आणि सर्वाधिक दूर अंतरावरचा ब्लॅकहोल आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आतापर्यंत दोन प्रकारचे ब्लॅकहोल शोधण्यात आले आहेत. यातील एक प्रकारचा ब्लॅकहोल हा तार्‍यांपासून बनतो. तर दुसरे सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोल असतात. तार्‍यांपासून बनलेल्या ब्लॅकहोलचे भारमान हे आपल्या सूर्यापेक्षा 10 पटीने जास्त असते. तर सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोलचे भारमान हे आपल्या सूर्यापेक्षा 10 लाख पटीपेक्षाही जास्त असते. अशा प्रकारच्या ब्लॅकहोल्सना ‘इंटरमिडिएट मास ब्लॅकहोल’ असेही म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने गुरुत्वाकर्षणीय तरंगामुळे बनणार्‍या ब्लॅकहोल्सचा समावेश असताते.

Back to top button