‘तिच्या’ पोटातून बाहेर काढले सात किलो केस! | पुढारी

‘तिच्या’ पोटातून बाहेर काढले सात किलो केस!

रांची :

बर्‍याच लोकांना काहीबाही खाण्याची विचित्र सवय असते. कुणी माती, वाळू खाते तर कुणी खिळे! केस खाण्याची सवय असणारी व पोटात केसांची गुंतावळ साठलेलीही अनेक उदाहरणे आहेत. आता झारखंडमध्ये अशाच एका युवतीच्या पोटातून तब्बल सात किलो केस बाहेर काढण्यात आले आहेत. सतरा वर्षांच्या या तरुणीला सतत पोटदुखी असण्याची तक्रार होती. 

या तरुणीची सोनोग्राफी केल्यावर तिच्या पोटात केस साठल्याचे दिसून आले. बोकारो जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या तरुणीला लहानपणापासूनच केस खाण्याची सवय होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात हळूहळू ही सवय सुटली. मात्र, तिला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. अखेर रुग्णालयात गेल्यावर तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी पोटात केसांचा गोळा असल्याचे दिसून आले. शस्त्रक्रिया करून हा गोळा काढण्यासाठी डॉक्टरांना सहा तास लागले. तेथील सर्जनने आपण गेल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच पोटात इतका मोठा केसांचा गोळा असल्याचे पाहिले, असे सांगितले.

Back to top button