हँड ग्रेनेड करणार महिलांचे संरक्षण! | पुढारी

हँड ग्रेनेड करणार महिलांचे संरक्षण!

वाराणसी ः देशातील महिलांबाबत घडणार्‍या अपराधांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी येथील तायक्‍वाँदोमध्ये सात ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या रचना राजेंद्र चौरासिया यांनी एक ‘वुमन सेफ्टी हँड ग्रेनेड’ विकसित केले आहे. त्याच्या सहाय्याने महिलांचे कोणत्याही आणीबाणीच्या क्षणी संरक्षण होऊ शकते. हे ‘ग्रेनेड’ फुटताच आपत्कालीन क्रमांकावर सूचना पोहोचते!

रचना चौरासिया यांनी सांगितले की ग्रेनेडमध्ये सीम कार्डचे ऑप्शन देण्यात आले आहे. त्यामध्ये पाच ते सात क्रमांक संरक्षित केले जाऊ शकतात. यामध्ये घरातील सदस्यांशिवाय आपत्कालीन क्रमांकही आहेत. यामध्ये एक ऑन-ऑफ ट्रिगर लावलेला आहे. तो दाबून ग्रेनेड फेकताच या संरक्षित क्रमांकांवर लोकेशनची माहिती जाते आणि हे लोक संबंधित ठिकाणी वेळीच येऊन महिलेचे संरक्षण करू शकतात. ही सर्व यंत्रणा वायरलेस टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. या ग्रेनेडचा आकार लहान असल्याने तो पर्स किंवा खिशातही ठेवला जाऊ शकतो. महिलांची पर्स किंवा मोबाईल हिसकावून घेण्यासारख्या घटनेतही ते सक्रिय होऊन काम करू लागते. त्याचा मोठा आवाज एक किलोमीटरपर्यंतही ऐकला जाऊ शकतो. त्यामुळे ऐकणारे कुणीही व्यक्‍ती तिथे येऊ शकतात.

Back to top button