नर्गिस पुन्हा एकदा प्रेमात? | पुढारी | पुढारी

नर्गिस पुन्हा एकदा प्रेमात? | पुढारी

नवी दिल्ली :

‘रॉकस्टार’ फेम बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी आपल्या ‘लव्ह लाईफ’वरून नेहमीच चर्चेत असते. आता तर ती तिसर्‍यांदा प्रेमात पडल्याची चर्चा होऊ लागली आहे. बॉलीवूडमधील एका चित्रपटात रणबीर कपूरसोबत काम करणारी नर्गिस सर्वप्रथम उदय चोपडासोबत रिलेशनमध्ये असल्याची मोठी चर्चा होती. मात्र, या दोहोंमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर तिने फिल्ममेकर मॅट अलोंजोसोबत डेट करण्यास सुरुवात केली. मात्र, हे रिलेशनसुद्धा जास्त काळ टिकले नाही. नर्गिस आता पुन्हा एकदा प्रेमात पडली असून ती अमेरिकन शेफ जस्टीन सँटोेशसोबत डेट करत आहे. 

बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस नर्गिस नेहमीच जस्टिससोबतचे व्हिडीओ आणि छायाचित्रे शेअर करत असते. उल्लेखनीय म्हणजे हे कपल काही दिवसांपूर्वी सुट्टीवर होते. यादरम्यान नर्गिसने शूटिंग रेंजवर निशाणा साधण्याचे धडे गिरवले. यावेळची काही छायाचित्रे आणि व्हिडीओ नर्गिसने शेअर केली आहेत. यामध्ये ती जस्टिनसोबत वेळ घालवताना दिसते. नर्गिसच्या यासंदर्भातील पोस्टवर इलियाना डिक्रूजने कमेंट करताना लिहिले आहे की, तू खूपच सुंदर दिसत आहेस. तसेच प्रीती झिंटा आणि अन्य कलाकारांनीही नर्गिसच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. 

दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलावयाचे झाल्यास नर्गिस ‘तोरबाज’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये संजय दत्त, राजू चढ्ढा, पुनित सिंगसह अन्य काही कलाकार दिसणार आहेत. नर्गिसचा यापूर्वीचा चित्रपट म्हणजे ‘अमावस’ होय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल दाखवू शकला नाही.

Back to top button