लग्‍नाच्या दिवशीच वधूने केली मारामारी! | पुढारी

लग्‍नाच्या दिवशीच वधूने केली मारामारी!

लंडन :

‘नववधू प्रिया मी बावरते…’ अशा आपल्याकडे काव्यपंक्‍ती आहेत. मात्र, सगळ्याच नववधू अशा बावरणार्‍या, लाजणार्‍या असतात असे नाही. बि—टनमध्ये साऊथ वेल्समधील एका नववधूने तर चक्‍क वधुवेशातच जोरदार हाणामारी केली. लग्‍नाच्या दिवशीच तिने दाखवलेला हा ब—ुस लीचा अवतार पाहून अनेक लोक थक्‍क झाले. या घटनेचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ही वधू सफेद वेडिंग गाऊनमध्ये दिसून येते. गेल्या शुक्रवारी तिचा डेव्हीड नावाच्या व्यक्‍तीशी विवाह झाला. विवाहानंतर लगेचच ही हाणामारीची घटना घडली. मात्र, आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर 31 वर्षांच्या डेलीमोर नावाच्या या वधूने खुलासा केला आहे. ‘आपण कध्धीच कुणाला मारले नाही, माझ्यावरही कुणी हात उगारला नाही’ असे तिने म्हटले आहे. आपण केवळ दोन गटांमध्ये होत असलेला ‘वाद’ सोडवत होतो असे तिने सांगितले. ती म्हणाली, आम्ही तिथून निण्याचा निर्णय घेतला, कारण मी दहा मिनिटांच्या अंतरावरील पेलेन रग्बी क्लबमध्ये रिसेप्शन पार्टी केली होती. ज्यावेळी आम्ही रिसेप्शनला जात होतो त्यावेळी क्लबच्या बाहेर दोन गटांमध्ये भांडण सुरू होते. मला माझा दिवस खराब करण्याची इच्छा नव्हती व म्हणून मी त्यांना शांत राहण्यास सांगितले. अर्थात तिचे हे म्हणणे काहीही असले तरी या व्हिडीओत ती स्वतः जमिनीवर पडलेलीही दिसून येते!

Back to top button