लॉकडाऊनमध्ये  सापडले 95 लाखांचे अँटिक टीपॉट | पुढारी

लॉकडाऊनमध्ये  सापडले 95 लाखांचे अँटिक टीपॉट

लंडन : चीनच्या वुहान शहरामधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी जगभरातील बहुतेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. या काळात तमाम लोक आपापल्या घरातच कैद झाले. काही लोकांसाठी हा काळ अत्यंत खडतर होता. मात्र, ब्रिटनमधील एका व्यक्‍तीला लॉकडाऊमधील मोकळा वेळच लखपती बनवून गेला. 

लॉकडाऊन काळात बाहेर जाऊन काम करणे शक्य नसल्याने ब्रिटनमधील एका व्यक्‍तीने आपल्या घराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. हे करत असतानाच त्याला आपल्या घरातील अत्यंत जुना टीपॉट सापडला. सुरुवातीला त्याने हा टीपॉट कोणाला तरी दान करण्याचा विचार केला. मात्र, त्याने दान करण्याचा विचार बदलून वस्तूंचे लिलाव करणार्‍या ठिकाणी हा टीपॉट नेला. त्यावेळी सांगण्यात आलेली माहिती ऐकून त्याला आश्‍चर्याचा  धक्‍काच बसला. कारण घरात सापडलेला हा टीपॉट सामान्य नसून तो अत्यंत मौल्यवान आहे.तसेच त्याची बाजारात तब्बल 95 लाख रुपये होते.

कोरोनाकाळात संपूर्ण जग संकटात असताना ब्रिटनमधील या व्यक्‍तीचे नशीब फळफळले. कित्येक वर्षे आपल्या घरात अडगळीत पडलेले टीपॉट आपल्याला क्षणार्धात श्रीमंत बनवेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. त्याने घराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला, हाच निर्णय त्याला श्रीमंत बनवून गेला.

Back to top button