‘बंटी और बबली-2’चे शूटिंग पूर्ण! | पुढारी

‘बंटी और बबली-2’चे शूटिंग पूर्ण!

मुंबई :

कोरोना महामारीच्या संकटकाळातच ‘बंटी और बबली-2’ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मूळ ‘बंटी और बबली’ हा चित्रपट राणी आणि अभिषेक बच्चन यांनी गाजवला होता. ऐश्‍वर्या राय-बच्चनचे अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यासमवेत चित्रीत केलेले ‘कजरा रे’ हे गाणेही त्यावेळी गाजले होते.

कोरोना काळात पूर्ण सुरक्षेची काळजी घेत यशराज फिल्म्सने ‘बंटी और बबली-2’ च्या एका गाण्यासह उर्वरित चित्रीकरण पूर्ण केले. कास्टला होम क्‍वारंटाईनपासून हॉटेलमधील सुरक्षित वातावरणात ठेवून सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली, जेणेकरून विषाणूचा फैलाव होणार नाही. सेटलाही चांगल्या प्रकारे सॅनिटाईज करण्यात आले होते, तसेच सर्व कलाकारांच्या कोरोना टेस्टही घेण्यात आल्या होत्या. शूटिंग पूर्ण झाल्यावर सैफने सांगितले, की आम्हाला सेटवर घरापेक्षाही अधिक सुरक्षित वाटत होते. सध्याचा काळ अतिशय संवेदनशील आहे व त्यामुळे सर्व प्रकारे काळजी घेणे हे क्रमप्राप्तच आहे. या सावधानीमध्येही आमचा शूटिंगचा अनुभव शानदार होता. शूटिंग पूर्ण झाल्यावर राणीही भावूक झाली. शूटिंगचा काळ आम्ही मजेत घालवला, असे तिने सांगितले. कोरोनाच्या आधीच्या काळातील शूटिंगचीही आम्हाला सतत आठवण येत होती, असेही तिने सांगितले.

 

Back to top button