हैदराबादमध्ये कोरोना रुग्णावर दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण | पुढारी

हैदराबादमध्ये कोरोना रुग्णावर दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण

हैदराबाद :

येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी 32 वर्षांच्या ‘कोव्हिड-19’ रुग्णावर देशातील पहिली ‘डबल लंग ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. हा रुग्ण सारकॉइडोसिसने ग्रस्त होता व त्याची दोन्ही फुफ्फुसे खराब झाली होती. त्यामुळे त्याच्या शरीरात दात्याने दान केलेली दोन फुफ्फुसे प्रत्यारोपित करण्यात आली आहेत.

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेजमध्ये (केआयएमएस) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तेथील डॉ. संदीप अत्तावर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या एका पथकाने चंदिगडच्या एका रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णाची प्रकृती वेगाने बिघडत चालली होती व फुफ्फुसे बदलणे हाच एकमेव मार्ग शिल्‍लक राहिला होता.

तो कोरोना विषाणूने संक्रमित झाल्याने स्थिती आणखी बिकट बनली. कोलकात्यातील एका ब—ेन डेड व्यक्‍तीची फुफ्फुसे त्याच्यामध्ये प्रत्यारोपित करण्यात आली. दात्याच्या या अवयवदानामुळे रुग्णाला आता नवे जीवन मिळाले आहे.

Back to top button