विजेच्या खांबावर अजगर! | पुढारी | पुढारी

विजेच्या खांबावर अजगर! | पुढारी

डेहराडून : या चित्रविचित्र दुनियेत कधी, कोणते द़ृश्य पाहायला मिळेल हे काही सांगता येत नाही. आता डेहराडूनच्या क्लेमेंटटाऊन परिसरात हवाई दलाच्या कार्यालयाजवळ असलेल्या विजेच्या खांबावर चक्क एक मोठा अजगर लटकत असताना दिसून आला!

हा अजगर पाहताच लोकांमध्ये घाबरगुंडी उडाली. खांबावर अजगर असल्याची सूचना तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वन विभागाच्या टीमने त्वरा करून खांबाला वेटोळे घालून अधांतरी बसलेल्या या अजगराला खाली आणले व त्याला जंगलात सोडून देण्यात आले. हा सुमारे दहा फूट लांबीचा जाडजूड अजगर होता. तो खांबावर अडकून पडला होता असे स्थानिक लोकांनी सांगितले. एक तासाच्या मेहनतीनंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांना त्याला खाली आणण्यात यश आले. या भागात साप कमीच दिसत असताना इतका मोठा अजगर लटकलेला पाहून लोक थक्क झाले!

Back to top button