पृथ्वीपासून दहा कोटी प्रकाशवर्ष अंतरावर ‘सुपरनोव्हा’! | पुढारी

पृथ्वीपासून दहा कोटी प्रकाशवर्ष अंतरावर ‘सुपरनोव्हा’!

वॉशिंग्टन : ज्यावेळी एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो त्यावेळी मोठा स्फोट होऊन त्यामधील घटक उत्सर्जित होतात. या प्रकाशमान घटनेला ‘सुपरनोव्हा’ असे म्हटले जाते. खगोल शास्त्रज्ञांनी आता पृथ्वीपासून दहा कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील अशाच ‘सुपरनोव्हा’चा शोध लावला आहे. 

ज्या तार्‍यामध्ये हा विस्फोट होत आहे त्याला ‘सुपरनोव्हा एलएसक्यू 14 एफएमजी’ या नावाने ओळखले जात आहे. त्याच्या सुपरनोव्हाचा प्रकाश तुलनेने अधिक तीव्र आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमधील एरिक हसियाओ यांच्या नेतृत्वाखालील 37 आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने या सुपरनोव्हाचा शोध घेतला. ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल’ या नियतकालिकात त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सुपरनोव्हाची ही घटना अनोखी असून याबाबतचे आमचे आकलनही बरेच रंजक आहे, असे हसियाओ यांनी म्हटले आहे. हा सुपरनोव्हा ‘टाईप ला सुपरनोव्हा’ म्हणून ओळखला जातो. असा सुपरनोव्हा बायनरी सिस्टीममध्ये होतो. त्यामध्ये दोन तारे असतात. एक तारा सफेद खुजा तारा असतो व दुसरा एखाद्या विशाल तार्‍यापासून छोट्या सफेद खुजा तार्‍यापर्यंत कोणताही असू शकतो. हे तारे एकाच प्रकारच्या जीवनचक्रातून जातात.

Back to top button