भूमीने पेडणेत घेतले देवीचे दर्शन | पुढारी

भूमीने पेडणेत घेतले देवीचे दर्शन

मुंबई : भूमी पेडणेकरचे आडनाव गोव्यातील पेडणे या गावावरून आले आहे. हे तिचे वाडवडिलांचे गाव. गावातील आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी ती गेली होती व तेथील फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पेडणेतील देवीच्या मंदिराच्या परिसरातच तिचे पैतृक घर आहे. तेथील सुमारे चारशे वर्षे जुन्या तीन मंदिरांचा तिने उल्लेख केला आहे. पेडणेकरांचा अगदी सुरुवातीचा उल्लेख 1902 चा असल्याचेही तिने म्हटले आहे. या मंदिरांबाबत अनेक कथा सांगितल्या जातात, तिथे औषधी गुण असलेल्या पाण्याचे झरे आहेत आणि मोठी ऊर्जा या परिसरात भरून राहिलेली आहे असे तिने म्हटले आहे.

याठिकाणी दिलेली प्रत्येक भेट बरेच काही शिकवून जाते. आमच्या संपन्न सांस्कृतिक वारशाबद्दल मी कृतज्ञ आहे. तेथून शांती, शक्ती आणि आनंद लाभतो असेही तिने म्हटले आहे. सध्या काही चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले असले तरी बॉलीवूड पूर्णपणे सक्रिय झालेले नाही. अनेक स्टार्स सध्या शूटिंगपासून दूरच आहेत. अशावेळी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवत आहेत. भूमीही सध्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवत असतानाच पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचेही काम करीत आहे.

Back to top button