‘आदिपुरुष’मध्ये नाही अनुष्का | पुढारी | पुढारी

‘आदिपुरुष’मध्ये नाही अनुष्का | पुढारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की अनुष्का शर्मा-कोहलीने ‘बाहुबली’ फेम प्रभासबरोबरचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट स्वीकारला आहे. मात्र, आता याबाबतची पुष्टी झाली आहे की ही एक अफवाच आहे! अनुष्का या चित्रपटात नाही तसेच या चित्रपटाशी संबंधित कोणतीही चर्चा तिच्याशी झालेली नाही. अनुष्का गर्भवती असून सध्या ती आपल्या आरोग्यावरच लक्ष केंद्रीत करीत आहे.

अनुष्का सध्या सुट्टीवरच असून आई बनल्यानंतरच ती योग्यवेळी काम सुरू करील. त्यानंतरच ती आपल्या चित्रपटांबाबतच्या घोषणा करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, ‘आदिपुरुष’मध्ये ती निश्चितच नाही असेही सूत्रांचे म्हणणे आहे. या चित्रपटाच्या पटकथेपासून ते तारखांपर्यंत कोणत्याही बाबतीत अनुष्काशी निर्मात्यांची चर्चा झालेली नाही. आपल्या कामांबाबत आता ती आई बनल्यानंतरच विचार करील. सध्या ती आणि विराट कोहली आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. अनुष्का विराटसमवेत दुबईला गेलेली असून तेथील दोघांचे काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत तरी ती काम करणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

 

Back to top button