बंगालच्या कलाकाराने बनवला सुशांतचा मेणाचा पुतळा | पुढारी

बंगालच्या कलाकाराने बनवला सुशांतचा मेणाचा पुतळा

कोलकाता :

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा चाहता असलेल्या एका बंगाली कलाकाराने त्याचा मेणाचा सुंदर पुतळा बनवला आहे. महिन्यापूर्वीच सुशांतचा मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयातही उभा केला जावा, अशी मागणी त्याच्या काही चाहत्यांनी केली होती. 

प. बंगालच्या आसनसोलमध्ये हा पुतळा बनवण्यात आला असून तो सुकांतो रॉय यांनी बनवला आहे. आता या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हुबेहूब सुशांतसारखाच हा पुतळा आहे. अनेकांना तिथे खरोखरच सुशांत उभा आहे की काय असे वाटावे, इतका तो चांगला बनला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनाही त्याचा असा पुतळा बनवून हवा असेल, तर मी तो बनवून देऊ शकतो, असे सुकांतो यांनी म्हटले आहे. लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात जगभरातील अनेक कलाकारांचे मेणाचे पुतळे आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांच्याही पुतळ्यांचा समावेश आहे. तेथे सुशांतचाही पुतळा असावा या मागणीसाठी ऑगस्टपासून ऑनलाईन मोहीम सुरू आहे. आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी यावर सह्या केल्या आहेत. विशेष म्हणजे, ही मागणी मादाम तुसाँ संग्रहालयापर्यंत पोहोचली आहे.

Back to top button