तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीच्या शुक्राणूचा शोध | पुढारी

तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीच्या शुक्राणूचा शोध

रंगून :

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने म्यानमारमधील एका झाडाच्या राळेत अडकलेल्या सुमारे दहा कोटी वर्षांपूर्वीच्या किड्याचा शोध घेतला आहे. कठीण कवच असलेल्या या किड्यामध्ये जगातील सर्वात जुन्या शुक्राणूचा आता शोध लागला आहे. 

‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’च्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. संशोधकांनी या किड्याच्या प्रजातीला ‘म्यान्मारसीप्राईस हुई’ असे नाव दिले आहे. दहा कोटी वर्षांपूर्वी झाडाच्या डिंकात अडकून पडण्याच्या काही वेळ आधीच या किड्याने मादीशी सहवास केला असावा असे अनुमान आहे. हे जीवाश्म शुक्राणू असामान्य व अत्यंत दुर्लभ आहे. यापूर्वी 1.7 कोटी वर्षांपूर्वीचे शुक्राणू आढळले होते. ‘म्यान्मारसीप्राईस हुई’ हे एक ओस्ट्रॅकोड आहे. ते एक प्रकारचे क्रस्टेशियन म्हणजे कठीण आवरण असलेला छोटा जीव आहे. असे जीव 50 कोटी वर्षांपूर्वीही अस्तित्वात होते. ‘रॉयल सोसायटी प्रोसिडिंग्ज बी’ या नियतकालिकात या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.

Back to top button