तर, समुद्राची पातळी वाढेल ३८ सेंटिमीटरने | पुढारी

तर, समुद्राची पातळी वाढेल ३८ सेंटिमीटरने

वॉशिंग्टन : सध्या प्रचंड वेगाने सुरू असलेले ग्रीन हाऊस वायूंचे उत्सर्जन असेच कायम राहिले तर ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकावरील बर्फाची चादर आणखी वेगाने वितळेल आणि 2100 सालापर्यंत समुद्राची पातळी 38 सेंटिमीटरने (15 इंच) वाढेल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. 

नासाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका संशोधनात वरील इशारा देण्यात आला आहे. यासंबंधीचे संशोधन ‘द क्रायोस्फेअर’ नामक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. जागतिक समुद्रपातळीच्या वृद्धीत बर्फाची चादर वितळून तयार होणारे पाणी हे सुमारे 33 टक्के योगदान देते. संशोधनातील दाव्यानुसार 2000 ते 2100 पर्यंत सागरी जलवृद्धीत ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका हे दोन बर्फाळ प्रदेश अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. मात्र, हे सर्व काही जलवायू उत्सर्जनात कसा बदल घडतो, यावरच सर्वश्री अवलंबून आहे. 

एक वर्षापूर्वीही शास्त्रज्ञांनी सावधानतेचा इशारा देताना, जलवायू उत्सर्जनामुळे केवळ तापमानच वाढत नसून उन्हाळ्यात घोंगावणार्‍या लू सारख्या वादळांची संख्याही वाढली आहे. यामुळे वन्यजीव आणि मानवाची मोठी हानी होऊ लागली आहे. सॅनफ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जोनाथन स्टिलमॅन यांच्या मतानुसार पृथ्वीवरील उन्हाळा आता जीवनासाठी घातक बनत चागला आहे.

Back to top button