‘नासा’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार अंतराळवीरांना! | पुढारी

‘नासा’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार अंतराळवीरांना!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे अनेक अंतराळवीर ‘अपोलो’ मोहिमांमधून चंद्रावर जाऊन आले आहेत. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी पहिल्या मोहिमेत चांद्रभूमीवर पाऊल ठेवले होते. आता 2024 मध्ये ‘नासा’ पुन्हा एकदा आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे. यावेळी हे अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध—ुवावर पाऊल ठेवतील.

या चांद्रमोहिमेसाठी 28 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा खर्च येईल. त्यापैकी 16 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे सव्वा लाख कोटी रुपये केवळ मॉड्यूलवरच खर्च होतील. अमेरिकेने 1969 पासून 1972 पर्यंत ‘अपोलो-11’ सह सहा चांद्रमोहिमा पार पाडल्या होत्या. यावर्षी 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रोजेक्टला आपल्या प्राधान्यक्रमात स्थान दिलेले आहे. या मोहिमेसाठी अमेरिकन संसदेकडून मंजूर होणारी रक्‍कम 2021-2024 दरम्यानच्या आर्थिक वर्षांमध्ये समाविष्ट केली जाईल. देशात निवडणुका असल्याने या निधीबाबत चिंता असल्याची प्रतिक्रिया ‘नासा’चे प्रमुख जिम ब—ाइडनस्टीन यांनी व्यक्‍त केली आहे.

Back to top button