कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक फेसशिल्ड नाही प्रभावी! | पुढारी

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक फेसशिल्ड नाही प्रभावी!

टोकियो : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंगबरोबरच अनेक लोक प्लास्टिक फेसशिल्डचाही वापर करीत असतात. मात्र, असे फेसशिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचे दिसून आले आहे. जपानी सुपरकॉम्प्युटर ‘फुगाकू’ने हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे फेसशिल्ड हे मास्कला पर्याय बनू शकत नाही असे संशोधकांनी म्हटले आहे. 

या कॉम्प्युटरनुसार प्लास्टिक फेसशिल्ड हे एअरोसोल्सना पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेले नाही. हे फेसशिल्ड कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरपैकी एक असलेल्या ‘फुगाकू’ने अशा फेसशिल्डचे सिमुलेशन केले आहे. त्यामध्ये शंभर टक्के एअरबॉर्न ड्रॉपलेटस् पाच मायक्रोमीटरहून लहान असल्याचे आढळले. ते प्लास्टिक विझार्डस्मधूनही वाचू शकतात. त्यामुळे पारदर्शक फेस शिल्डमधून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकत नाही असे सांगण्यात आले. एक मीटरच्या दहाव्या लाखाचा भाग हा मायक्रोमीटर असतो. ‘रिकेन सेंटर फॉर कॉम्प्युटर सायन्स’मधील टीम प्रमुख मोटो त्सुबोकोरा यांनी सांगितले की फेसशिल्डला मास्कचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ नये. फेस मास्कच्या तुलनेत फेसशिल्ड अतिशय कमी प्रभावी आहे.

Back to top button