स्पीडबोटच्या रूपातील कार! | पुढारी | पुढारी

स्पीडबोटच्या रूपातील कार! | पुढारी

न्यूयॉर्क : हल्‍ली मोटारींचेही भलतेच ‘मॉडिफिकेशन्स’ केले जाते. आता अशाच एका कारचा व्हिडडओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये रस्त्यावरून वेगात धावत असलेली ‘स्पीडबोट’ दिसून येते. अर्थातच ही खरी स्पीडबोट नसून ती स्पीडबोटच्या रूपातील कार आहे.

या कारचे डिझाईन हुबेहूब एखाद्या स्पीडबोटसारखेच आहे. वरचा भाग बोटीचा आणि खाली चार चाकं असे तिचे हे रूपडे पाहून लोक थक्‍क झाले. या बोटवजा कारचा व्हिडीओही तिच्या वेगासारखाच वेगाने व्हायरल झाला. आतापर्यंत हा व्हिडीओ अकरा हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील असावा असे म्हटले जाते. एखाद्या छत नसलेल्या, खुल्या मोटारीला असेही रूप दिले जाऊ शकते हे पाहून अनेक यूजर्स थक्‍क झाले.

Back to top button