समुद्रातील एक पेशीय जीव खाऊ शकतो विषाणूला | पुढारी

समुद्रातील एक पेशीय जीव खाऊ शकतो विषाणूला

न्यूयॉर्क : समुद्रातील अतिशय लहान आकाराचा व एक पेशीय जीव विषाणूला खाऊ शकतो असे दिसून आले आहे. या जीवाला ‘प्रोटिस्ट’ असे म्हटले जाते. हा जीव समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्यात तरंगत असतो. स्पेनच्या कॅटालोनिया तटाजवळील समुद्रात असा जीव दिसून आला आहे. 

या जीवांचे ‘खोनोझोन्स’ आणि ‘पिकोझोन्स’ असे दोन प्रकार असल्याचे आढळले आहे. त्यांच्यामध्ये विशिष्ट असे डीएनए असते. मैनेच्या आखातातही अशा प्रकारचे जीव दिसून आले आहेत. मैनेमधील ‘बिगेलो लॅबोरेटरी फॉर ओशन सायन्सेस’मधील ज्युलिया ब—ाऊन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, या दोन प्रकारांतील काही जीव एकमेकांपेक्षा अगदी भिन्‍न व दूरचे नाते असलेले आहेत. हे एकपेशीय जीव विषाणूंचाही अन्‍न म्हणून वापर करू शकतात. योगायोगाने ते असे विषाणू उचलू शकतात किंवा ते या विषाणूंनी संक्रमित होऊ शकतात. ‘फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी’च्या ऑनलाईन अंकात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button