‘तिने’ केले होते अंतराळातील पहिले डीएनए सिक्‍वेन्सिंग | पुढारी

‘तिने’ केले होते अंतराळातील पहिले डीएनए सिक्‍वेन्सिंग

वॉशिंग्टन ः

‘नासा’ची अंतराळवीरांगणा कॅथलीन रुबिन्स ऊर्फ केट रुबिन्स आता आणखी एका अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. केटनेच अंतराळातील पहिल्या डीएनए सिक्‍वेन्सिंगची कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. 2009 मध्ये ‘नासा’ने अंतराळवीर म्हणून तिची निवड केली होती.

अंतराळात एखाद्या सजीवाच्या डीएनएशी निगडीत काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी केटने पार पाडली होती. तिने मॉलिक्यूलर बायोलॉजीमध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून पदवी संपादन केली आहे. ‘कँसर बायोलॉजी’मध्ये तिने स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून पीएच.डी.ही केली आहे. सध्या ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात फ्लाईट इंजिनिअर म्हणून जबाबदारी पेलण्यासाठीचे प्रशिक्षण घेत आहे. 14 ऑक्टोबर 2020 ला ती कझाकिस्तानातून ‘सोयूझ एमएस-17’ या यानामधून अंतराळ स्थानकाकडे रवाना होईल. तेथील कोल्ड अ‍ॅटम लॅबोरेटरीत ती कार्डियो व्हॅस्क्युलरबाबत काही प्रयोग करणार आहे.

 

Back to top button