जगाच्या नाशाची वेळ सांगणारे घड्याळ! | पुढारी

जगाच्या नाशाची वेळ सांगणारे घड्याळ!

जगबुडी, प्रलयाची काल्पनिक आणि खोटी भाकिते आजपर्यंत अनेक झालेली आहेत. ‘अमक्या दिवशी जग नष्ट होणार’ असे सांगणारी भाकितं या 21 व्या शतकातही लोकांचे लक्ष वेधत असतात. असेच धोक्याची सूचना देणारे एक घड्याळ अमेरिकेत न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये आहे. अर्थातच हे अतिरंजित किंवा अफवा पसरवणारे घड्याळ नसून लोकांचे पर्यावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधून घेणारे घड्याळ आहे. त्यामध्ये जगाच्या अस्तित्वासाठी किती वेळ शिल्‍लक राहिला आहे हे दाखवले जाते!

या घड्याळाचे नाव ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल डिजिटल क्लॉक’ असे आहे. हे अनोखे घड्याळ दोन आर्टिस्टनी बनवले आहे. गॅन गोलन आणि अँड्र्यू बॉयड अशी त्यांची नावं. हे घड्याळ सध्या असे सांगत आहे की जगाकडे सध्या केवळ 101 दिवस, सतरा तास,29 मिनिटे आणि 22 सेकंद शिल्‍लक आहेत. जगात गेल्या अनेक वर्षांपासून कार्बनचे प्रमाण अत्याधिक वाढले आहे आणि आगामी काळात ते इतके वाढेल की त्याचा स्तर नियंत्रित करणे कठीण जाईल.

निसर्गाशी, पर्यावरणाशी केलेली छेडछाड भयानक परिणाम दाखवणारी ठरेल. त्यामुळे जगाच्या मोठ्या भागात महापुराचे संकट येईल, जंगलांमध्ये वणवे लागतील, दुष्काळ पडेल व लोकांना स्थलांतरित व्हावे लागेल. तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ होईल. त्यामुळे उष्णता इतकी वाढेल की लोकांना भयानक पाणीटंचाईचाही सामना करावा लागेल. अर्थातच या घड्याळामागील हेतू लोकांना पसंत असला तरी या घड्याळातून जे दर्शवले जात आहे ते अनेकांना मान्य नाही!

 

Back to top button