दीपिका अडकल्यास 'त्यांना' ६०० कोटींचा चुना! | पुढारी

दीपिका अडकल्यास 'त्यांना' ६०० कोटींचा चुना!

मुंबई ः

ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेल्या दीपिका पदुकोणवर मनोरंजन क्षेत्राचे 600 कोटी रुपये गुंतले आहेत. त्यामध्ये दोन चित्रपट आणि 33 ब—ँड एंडोर्समेंट यांचा समावेश आहे. बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आल्यापासून याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. त्याचा थेट परिणाम तिच्या करिअरवरही पडलेला दिसून येत आहे. 

दीपिकाच्या आगामी चित्रपटांमध्ये निर्माता मधु मंतेना यांच्या एका अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचा तसेच दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच, वेगवेगळ्या 33 एंडोर्समेंटसाठी तिने करार केलेला आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट अतुल मोहन यांच्या माहितीनुसार दीपिका प्रत्येक एंडोर्समेंटसाठी आठ ते बारा कोटी रुपये मेहनताना घेते. मधु मंतेना यांचा चित्रपट पौराणिक कथेवर आधारित आहे असे म्हटले जाते.

त्यामधील तिची भूमिका महाभारतातील द्रौपदीशी प्रेरित असल्याचेही सांगितले जाते; पण याबाबतची तपशिलवार माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे दीपिकाबरोबरच मधु मंतेनाही ड्रग्ज वादात अडकलेले आहेत. ट्रेड अ‍ॅनालिस्ट आणि 40 वर्षांपासून वितरण क्षेत्रात सक्रिय राज बन्सल यांनी सांगितले की, या वादाचा दीपिकाच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ट्रेड पंडित अतुल मोहन यांनी म्हटले आहे की संजय दत्तही विविध प्रकरणांमध्ये अडकलेला होता. तरीही प्रेक्षकांनी त्याचा स्वीकार केलाच. त्यामुळे चित्रपटांबाबत दीपिकाचे फारसे नुकसान होणार नाही, मात्र, एंडोर्समेंटच्या स्तरावर तिचे काही नुकसान होऊ शकते.

Back to top button