‘ड’ जीवनसत्त्वाचा खजिना असतात मासे! | पुढारी

‘ड’ जीवनसत्त्वाचा खजिना असतात मासे!

नवी दिल्‍ली : सध्याच्या कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे हे गरजेचे बनले आहे. ‘क’ जीवनसत्त्वाप्रमाणेच ‘ड’ जीवनसत्त्वही यासाठी शरीराला आवश्यक असते. मासे हा त्याचा उत्तम स्रोत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मांसाहारामध्ये मत्स्याहार हा सर्वाधिक आरोग्यदायी ठरतो.

माशांमधून मोठ्या प्रमाणात लाभदायक फॅटस् मिळतात. माशांमध्ये ‘ओमेगा थ्री’ हे फॅटी अ‍ॅसिड असते. ते अनेक बाबतीत आरोग्याला गुणकारी ठरते. लहान मुलांमधील ‘टाईप वन’ मधुमेहासारख्या आजारांवर ते गुणकारी ठरते. नियमित मासे खाणार्‍या लोकांमध्ये नैराश्य येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मधुमेह व उच्च रक्‍तदाबासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठीही मत्स्याहार उपयुक्‍त ठरतो. वेगवेगळ्या अवयवांसाठी, विशेषतः हृदयासाठी मत्स्याहार लाभदायक आहे. मासे हे ‘ड’ जीवनसत्त्वाचा जणू खजिनाच असतात. विविध जातींच्या माशांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत मिळते.

Back to top button