न्यायाधीशांच्या मांडीवरून मुलाने दिली वडिलांना शिक्षा | पुढारी

न्यायाधीशांच्या मांडीवरून मुलाने दिली वडिलांना शिक्षा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोड कॉन्टिनेंटमध्ये न्यायाधीशांच्या मांडीवर बसून पाच वर्षांच्या एका बालकाने आपल्याच वडिलांना दंडाची शिक्षा ठोठावली. याबाबतचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मुलाच्या वडिलांवर कार पार्कमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्‍लंघन केल्याचा आरोप होता. शिक्षेच्या दिवशी आरोपी आपल्या पाच वर्षांच्या मुलासह न्यायालयात आला होता. न्यायाधीशांचे लक्ष या मुलाकडे गेल्यावर त्यांनी विचारले की हा कोण आहे? आरोपीने तो आपला मुलगा असल्याचे सांगितल्यावर न्यायाधीशांनी त्याला माझ्या मांडीवर बसवू का? असे विचारले. हा मुलगा न्यायाधीशांच्या मांडीवर बसल्यावर त्यांनी त्याला तीन पर्याय सांगितले. ते म्हणाले, मी तुझ्या वडिलांना 90 डॉलर्स, 30 डॉलर्सचा दंड ठोठावू की त्यांना माफ करू? त्यावर या जेकब नावाच्या मुलानेही धीटपणे म्हटले, वडिलांना 30 डॉलर्सचा दंड द्यावा. त्याचे उत्तर ऐकून न्यायाधीशही चकीत झाले व त्याला ‘तू चांगला न्यायाधीश आहेस’ असे म्हटले! हा व्हिडीओ एका दिवसातच 80 लाख लोकांनी पाहिला!

Back to top button