किंग खानसोबत ‘पठाण’मध्ये दीपिका | पुढारी | पुढारी

किंग खानसोबत ‘पठाण’मध्ये दीपिका | पुढारी

नवी दिल्ली :

‘किंग खान’ म्हणून आळखला जाणारा अभिनेता शाहरूख खानचे सध्या दुबईत वास्तव्य आहे. हा अभिनेता आयपीएलमधील आपल्या केकेआर संघासोबत स्टेडियममध्ये वारंवार दिसत आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून दीर्घकाळ लांब राहिलेला शाहरूख खान आता ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोनही असणार आहे. 

‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, हा चित्रपट पुढील वर्षात दिवाळीच्या सुमारास रीलिज होण्याची शक्यता आहे. ‘पठाण’ ही एक बिग बजेट फिल्म आहे. यामुळेच तो सणासुदीच्या काळात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र, यंदा शाहरूखचा एकही चित्रपट झळकणार नाही. शाहरूख सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे.

शाहरूख, जॉन अब्राहम व दीपिका यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’च्या चित्रीकरणास नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. असेही सांगितले जात आहेत की, सर्वप्रथम शाहरूखचे सोलो सीन चित्रीत केले जाणार आहेत. दरम्यान, प्रथमच शाहरूख आणि जॉन अब्राहम एकत्र काम करणार आहेत. हे दोघेही पठाणच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर दीपिकाही प्रमुख भूमिका करणार आहे.

यशराज बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट बिग बजेट व अ‍ॅक्शनपट असणार आहे. याचा क्लायमेक्सही धमाकेदार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बहुतेक चित्रीकरण विदेशात होणार असल्याचेही समजते.

Back to top button